भुजबळांना मंत्रिमंडळात स्थान न दिल्याने सकल ओबीसी समाज संतप्त
| जालना | प्रतिनिधी |
नागपूर येथे झालेल्या मंत्रिमंडळ शपथविधी सोहळ्यात रविवारी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यामुळे जालना शहरातील सकल ओबीसी समाजाने गांधी चमन चौकात राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध व्यक्त केला.
प्रा. सत्संग मुंढे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या जोडे मारो आंदोलनात डॉ. विशाल धानूरे, संतोष रासवे, बाबासाहेब सोनवणे, मंगल खांडेभराड, शिवप्रकाश चितळकर, गणेश वाघमारे, गंगुताई वानखेडे, दीपक वैद्य, राजू पवार, हबीबुल्ला हसन मुजावर बेग, नितीन इंगळे, बाबासाहेब वानखेडे, श्रीराम शाक्य, अनिल वाघमारे, बळीराम तिडके, दिनेश यादव, नंदकिशोर जावळे, संदीप जायभाय, शंकर घनवट, ज्ञानेश्वर खरात आदी उपस्थित होते. याप्रसंगी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. दरम्यान, भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान देऊन त्यांचा योग्य सन्मान न केल्यास यापेक्षाही आक्रमक पद्धतीने आंदोलन छेडण्याचा इशारा आंदोलकांनी दिला.