। वडखळ । प्रतिनिधी ।
मुंबई- गोवा महामार्गावर परप्रांतीयांनी अनाधिकृतपणे भंगारच्या अड्डा उभारला असून या ठिकाणी कंपन्यांचा येणारा माल चोरीद्वारे घेतला जात असल्याची माहिती दादर सागरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय कुमार ब्राह्मणे यांना मिळताच त्यांनी त्या ठिकाणी धाड टाकून जेएसडब्ल्यू कंपनीचा 10 लाखांचा स्टील बार जप्त केला व आरोपीस अटक केली आहे.
रायगड जिल्ह्याच्या अनेक भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून अनाधिकृतपणे भंगारवाल्यांचे जाळे मोठ्या प्रमाणावर पसरले असून त्यातच जेएसडब्ल्यू कंपनी डोलवी येथून टीएमटी स्टील बार माल विविध कंपन्यांना सप्लाय करण्यासाठी ज्योती स्ट्रान्सपोर्ट मधील ट्रेलर वरील चालक व इतर काही ट्रेलर चालकांनी सदरचा पूर्ण माल विविध कंपन्याना न पुरविता अंदाजे 15 ते 20 टन मालाचा अपहार करुन तो जिते येथील आकाशदीप हॉटेलच्या पाठीमागे मोकळ्या जागी अनाधिकृतपणे उभारलेल्या भंगारवाल्यांकडे उतरविले असल्याची माहिती कंपनीचे जनरल मॅनेजर यांनी दादर सागरी पोलीस स्टेशनला दिली. त्यानुसार तपास करत दादर सागरी पोलीस निरीक्षक संजयकुमार ब्राह्मणे यांनी आपल्या पथकासह रात्रीच्या 8 च्या सुमारास आकाशदीप हॉटेलच्या पाठीमागे धाड टाकली.