। रेवदंडा । प्रतिनिधी ।
अलिबाग तालुक्यातील वाडगाव येथील कुस्ती प्रशिक्षण केंद्रात तालुका कुस्तीगीर संघटना व वाडगाव हनुमान तालिम संघ यांच्या विद्यमाने बुधवारी (दि.25) तालुका अजिंक्यपद कुस्ती निवड चाचणी स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाली. यावेळी तालुक्यातील अनेक गावागावांतील कुस्तीपट्टू मल्लांनी या निवड चाचणीत सहभाग घेतला होता.
या स्पर्धेत सब ज्युनिअर मुलें, सब ज्युनिअर मुलीं, वरिष्ठ गट पुरूष माती व गादी, वरिष्ठ गट महिला विभाग, वरिष्ठ गट पुरूष ग्रिको रोमन, बाळ गट मुले व बाळ गट मुली आदी वजनाच्या कुस्त्या गुणांवर खेळविण्यात आल्या होत्या. कुस्ती स्पर्धेचे सुत्रसंचलन व समालोचन प्रमोद भगत यांनी केले. तसेच, स्पर्धेत वैभव मुकादम, सुधाकर पाटील, प्रसन्ना पाटील, जितेंद्र गांवड, व यतिराज पाटील यांनी पंच म्हणून काम पाहिले.
यावेळी, रायगड जिल्हा कुस्तीगीर संघटना तथा अलिबाग तालुका कुस्तीगीर संघटना अध्यक्ष जयेंद्र भगत, उपाध्यक्ष कृष्णा भोपी, प्रसाद भगत, रविंद्र घासे, वैभव मुकादम, विलास पाटील, चंद्रकांत थळे, गोपिनाथ ठाकूर, सरपंच सारिका पवार आदींसह ग्रामपंचायत सदस्य, अन्य मान्यवर व कुस्तीप्रेमी मंडळी यांची उपस्थिती होती.







