। पुणे । वृत्तसंस्था ।
प्रसुतीकळा सुरू झाल्याने रूग्णालयात दाखल झालेल्या एका गर्भवती महिलेला डॉक्टरकडून अमानुष मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. दौंड तालुक्यातील यवत येथील एका जयवंत रुग्णालयात ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे. याप्रकरणी पीडितेने केलेल्या तक्रारीनुसार यवत पोलीस ठाण्यात आरोपी डॉक्टर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलीस करीत आहेत.






