। पनवेल । वार्ताहर ।
विदेशी सिगारेट विक्री करण्यास बंदी असतानाही त्याची विक्री कऱणार्या एका विक्रेेत्याविरूद्ध आमली पदार्थ विरोधी पथक गुन्हे शाखेने कारवाई करून त्याच्याकडून जवळपास सहा हजारांच्या विदेशी सिगरेट हस्तगत केल्या आहेत. कळंबोली वसाहतीतील से.-14 सिद्धी सोसायटी या ठिकाणी संदिपकुमार राम खेलावन गुप्ता हा बेकायदेशिररित्या विदेशी सिगरेटचा साठा करून विक्री करत असल्याची माहिती नवी मुंबई अमली पदार्थ विरोधी पथकास मिळताच त्यांनी सदर ठिकाणी छापा टाकून सहा हजारांच्या विदेशी सिगरेट हस्तगत केल्या आहेत व त्याच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.





