विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर
। दिल्ली । वृत्तसंस्था ।
दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल समोर आला असून दिल्लीमध्ये भाजपचे कमळ फुलले आहे. आम आदमी पार्टीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा पराभव झाला आहे. तर भाजपचे परवेश वर्मा विजयी झाले आहेत.
नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातून आपचे अरविंद केजरवील आणि भाजपच्या परवेश वर्मा यांच्यात लढत झाली होती. या निवडणुकीचा निकाल समोर आला असून परवेश वर्मा यांनी 1844 मतांनी विजयी मिळवला आहे. तर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल पराभूत झाले आहेत. आपचा हुकुमी एक्का असलेले केजरीवाल पराभूत झाल्याने पक्ष कार्यकर्त्यांना मोठा धक्का बसला आहे.