• Login
Sunday, March 1, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

अलिबागेतील आरएमसी प्लांट वादाच्या भोवर्‍यात

Sanika Mhatre by Sanika Mhatre
March 16, 2025
in sliderhome, अलिबाग, रायगड
0 0
0
अलिबागेतील आरएमसी प्लांट वादाच्या भोवर्‍यात
0
SHARES
836
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

कामगारांकडून स्थानिकांना मारण्याची धमकी

। अलिबाग । प्रतिनिधी ।

आरएमसी प्लांट नागरिकांसह महिला, लहान मुलांच्या आरोग्यावर परिणाम करणारा असून, तो धोकादायक असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते अमित म्हात्रे यांच्यासह काही मंडळींनी केला आहे. जिल्हा प्रशासनाची परवानगी न घेता या प्रकल्पाचे काम सुरू असताना, हा प्रकल्प आता पुन्हा वादाच्या भोवर्‍यात सापडला आहे. आरएमसी प्रकल्पाविरोधात ग्रामपंचायतीकडे तक्रार केल्याचा राग धरून तेथील एका कामगाराने स्थानिकाला जीवे मारण्याची धमकी दिली आहे. याबाबत अलिबाग पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली आहे.

रेवस ते रेड्डी हा सागरी महामार्ग प्रकल्प उभारला जाणार आहे. या प्रकल्पाच्या कामासाठी लागणार्‍या सिमेंटचे उत्पादन करणारा कारखाना कावीर गावानजीक अलिबाग-वावे रस्त्यालगत उभारला जाणार आहे. चेन्नई येथील आरपीपी इन्फ्रा प्रोजेक्ट या कंपनीमार्फत ते काम केले जाणार आहे. मात्र, कावीर परिसर कृषी व रहिवासी क्षेत्राचा असल्याने औद्योगिक प्रकल्प उभारणे बेकायदेशीर असल्याचा आरोप काही महिन्यांपूर्वीच सामाजिक कार्यकर्ते अमित म्हात्रे यांनी केला होता. याबाबत त्यांनी तहसीलदारांपासून जिल्हा प्रशासनाकडे तक्रार केली होती. या तक्रारीची दखल न घेतल्याने त्यांनी पुन्हा प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी तक्रार अर्ज केला. त्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले. मंडळ अधिकार्‍यांसह प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तेथील पाहणी करून पंचनामे केले. मात्र, जिल्हा प्रशासनाची परवानगी न घेता या प्रकल्पाचे काम सुरू आहे. शेतजमिनीमध्ये काम करताना जिल्हा प्रशासनाची परवानगी घेणे आवश्यक असतानादेखील तेथील ठेकेदार मनमानी कारभाराने काम करीत असल्याचा आरोप म्हात्रे यांनी केला आहे.

आरएमसी प्लांटचे काम अनधिकृत असल्याचा ठपका प्रशासनाकडून ठेवला जात असताना हा प्रकल्प आता पुन्हा वादाच्या भोवर्‍यात सापडला आहे. नुकत्याच काही दिवसांपूर्वी एका शेतकर्‍याने आरएमसी प्लांट धोकादायक असून, प्रदूषणामुळे आरोग्याला धोका निर्माण होण्याची भीती असल्याची तक्रार कावीर ग्रामपंचायतीकडे केली होती. त्याबाबत राग धरून तेथील प्लांटमधील कामगारांनी तक्रारदाराला मारहाण करून ठार मारण्याची धमकी दिली. याबाबत अलिबाग पोलीस ठाण्यात त्या कंपनीतील कामगाराविरोधात तक्रार करण्यात आली आहे. प्रकल्पातील कामगारांसह ठेकेदारांच्या मनमानी कारभारामुळे तसेच गुंडगिरीमुळे स्थानिकांच्या सुरक्षेचा प्रश्‍न गंभीर झाल्याचे चित्र या घटनेतून पहावयास मिळत आहे. याकडे पोलीस प्रशासनासह जिल्हा प्रशासन गांभीर्याने लक्ष देईल का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

महसूल विभागाला उशिरा जाग
कावीर येथील आरएमसी प्लांट वादग्रस्त ठरत आहे. हा प्लांट सुरू करण्याआधी येथील गट नं./स.नं गट नं/स.नं 13, 14, 17/1 व 17 /2 या मिळकतीमध्ये सक्षम प्राधिकार्‍यांची पूर्वपरवानगी न घेता औद्योगिक प्रकल्पाचे अनधिकृतपणे बांधकाम करण्यात आल्याचे मंडळ अधिकार्‍यांनी अहवालात स्पष्ट नमूद केले आहे. महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना यांच्या तरतुदींचा भंग झाल्याचे प्रथमदर्शनी समोर आले आहे. त्यानुसार हे बांधकाम अनधिकृत ठरविण्यात आले असून, ते तात्काळ थांबविण्याचे आदेश तहसीलदार विक्रम पाटील यांनी दिले आहेत. तसेच बांधकाम न थांबविल्यास कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.


कावीर येथील आरएमसी प्लांट बंद करण्याबाबतची तक्रार प्राप्त झाली आहे. त्यानुसार प्रकल्प व सभोवतालच्या परिसराची संयुक्त पाहणी करण्यात आली आहे. दरम्यान, आढळून आलेल्या त्रुटींच्या अनुषंगाने जल आणि हवा कायद्यांतर्गत प्रस्तावित निर्देश पारित करण्यात आलेले आहेत.

रा.सं. कामत,
उपप्रादेशिक अधिकारी, रायगड-2, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ


अर्जदार यांनी केलेल्या तक्रारीच्या रागातून धमकी दिल्याचा अदखलपात्र गुन्हा दाखल ठाणे अंमलदारामार्फत दाखल केला जातो. त्याबाबत पुढील कार्यवाही काय केली. याची पडताळणी करून माहिती देण्यात येईल.

किशोर साळे,
पोलीस निरीक्षक, अलिबाग पोलीस ठाणे

Related

Tags: alibag newsindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadRMC Plantsocial media newssocial news
Previous Post

वाळूमाफियांनी नद्या उखरल्या

Next Post

सुकेळी खिंडीत ट्रेलर पलटी; वाहनचालक जखमी

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

sliderhome

सुरूच्या बनात रात्रीस खेळ चाले

February 28, 2026
अधिकाऱ्यांचा अट्टाहास प्रवाशांना त्रासदायक
sliderhome

अधिकाऱ्यांचा अट्टाहास प्रवाशांना त्रासदायक

February 28, 2026
आरडीसीसी बँकेच्या सभागृहात कार्यशाळेचे आयोजन
sliderhome

आरडीसीसी बँकेच्या सभागृहात कार्यशाळेचे आयोजन

February 28, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट

February 28, 2026
खालापूर टोलनाक्यावर गोमांस तस्करीचा पर्दाफाश
sliderhome

खालापूर टोलनाक्यावर गोमांस तस्करीचा पर्दाफाश

February 28, 2026
झाडाला धडकून विमान कोसळले
sliderhome

झाडाला धडकून विमान कोसळले

February 28, 2026
Next Post
सुकेळी खिंडीत ट्रेलर पलटी; वाहनचालक जखमी

सुकेळी खिंडीत ट्रेलर पलटी; वाहनचालक जखमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?