चोराच्या उलट्या बोंबा
। अलिबाग । वार्ताहर ।
कर्जत येथे 500 रूपयांच्या उधारीवरून सुरू झालेला वाद अगदी टोकावर जाऊन पोहोचला. स्वतः उधारी म्हणून घेतलेले पैसे जेव्हा मागितले तेव्हा एकाला एक ठिणगी लागत या प्रकरणात आरोपी याने फिर्यादी यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला. फिर्यादी रा.पोटल, पो.गौळवाडी, ता.कर्जत यांच्या ओळखीचा आरोपी रा.आंबोट ता.कर्जत यांनी फिर्यादींकडून 500 रुपये उधार घेतले होते. जेव्हा फिर्यादींनी उधारीवर दिलेले पैसे मागीतले तेव्हा त्या गोष्टीचा मनात राग धरून आरोपीने दारूच्या नशेत येऊन फिर्यादी यांना शिविगाळी करून तुला बघुन घेईन अशी दमदाटी केली. यावर फिर्यादी यांनी दि.26 ऑक्टोबर रोजी कर्जत पोलीस ठाण्यात आरोपी विरूदध अदखलपात्र गुन्हा दाखल केला म्हणून आरोपीत याने फिर्यादी घरासमोरील रोडवर उभे असताना हातात मोटार सायकलची चैन घेऊन फिर्यादी यांस शिविगाळी व दमदाटी करून चैनिने उजव्या पायावर व डोक्यावर फटके मारून जखमी करून जीवे मारण्याची धमकी दिली.
याबाबत कर्जत पोलीस ठाणे येथ गुन्हा दाखल करण्यात आला असुन अधिक तपास पोह/1137 लावरे हे करीत आहेत.