| रायगड | वार्ताहर |
सामाजिक न्याय विभागांतर्गत मागासवर्गीय विद्यार्थीनींकरिता मागासवर्गीय व आर्थिकदृष्टया मागास मुलींचे शासकीय वसतिगृह, दिव्या अपार्टमेंट, यामाहा शोरुम, आर.सी.एफ.गेटसमोर, वेश्वी अलिबाग येथे कार्यरत आहे.
या वसतिगृहामध्ये इ.8 वी पासून गरीब, हुशार, होतकरू, मागासवर्गीय अनु.जाती, अनु.जमाती , विमुक्त जाती व भटक्या जमाती, इतर मागासवर्गीय, विशेष मागास प्रवर्ग,आर्थिकदृष्या मागास, अनाथ व अपंग यांना गुणवत्तेनसार प्रवेश दिला जातो. वसतिगृहात विद्यार्थींनीकरिता मोफत निवासव्यवस्था असून दोनवेळा नाष्टा देण्यात येतो.
शैक्षणिक साहित्य देखील विनामूल्य पुरविले जाते. तसेच दैनंदिन व वैयक्तिक खर्चाकरिता म्हणून दरमहा रू.600/- निर्वाहभत्ता दिला जातो. शालेय व गणवेश पात्र महा.विद्यार्थीनींना दोन संचाकरिता गणवेश भत्ता/रेनकोट/छत्री भत्ता दिला जातो. या व्यतिरिक्त रेनकोट, छत्री भत्ता, संगणक, ग्रंथालय सुविधा, क्रिडा साहित्य,मनोरंजन इ. अनेक सुविधा उपलब्ध आहेत.
प्रवेशपात्र विद्यार्थीनींच्या पालकांचे सर्व मार्गानी मिळून वार्षिक उत्पन्न अनु.जाती, अनु.जमाती विद्यार्थीनींकरिता रूपये 2 लाख 50 हजारचे आत व विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्गीय, विशेष विद्यार्थीनींकरिता रू.1 लाखाचे आत असावे. ऑफलाईन प्रवेश अर्जासोबत तहसिलदार यांच्या सहीचा सन 2025-26 मधील उत्पन्नाचा दाखला, जातीचे मुलकी अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र, मागील इयत्ता पास झाल्याचे गुणपत्रक,आधारकार्ड, शाळा/कॉलेजचे बोनाफाईड या कागदपत्रांच्या सत्यप्रती जोडणे आवश्यक आहेत. सन 2025-26 या शैक्षणिक वर्षाकरिता वसतिगृह प्रवेश अर्ज हे वसतिगृहात उपलब्ध करण्यात आले आहेत. अधिक माहितीकरिता गृहपाल, मागासवर्गीय व आर्थिकदृष्टया मागास मुलींचे शासकीय वसतिगृह,अलिबाग यु.एस.गुजेला (मो.8767339974) यांच्याशी कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन गृहपाल यु.एस.गुजेला यांनी केले आहे.







