| मुंबई | प्रतिनिधी |
मान्सून राज्यात पुन्हा सक्रीय झाला असून, येत्या तीन ते चार दिवसात राज्यातील बहुतांश भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. रायगड, कोकणसह मध्य महाराष्ट्रात येत्या आठवड्याभरात मुसळधार पावसाची शक्यताही वर्तविण्यात आली आहे.
कोकणात शुक्रवारपासून रविवारपर्यंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. शुक्रवारी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, अकोला, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे. येत्या तीन आठवड्यात देशभरात चांगला पाऊस होऊ शकतो असं हवामान शास्त्रज्ञ केएस होसाळीकर यांनी सांगितलं आहे. देशात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता असून काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण होऊ शकते.







