| संगमेश्वर | प्रतिनिधी |
संगमेश्वर तालुक्यातील कळंबुशी ग्रामपंचायतीतर्फे गावातील रहिवाशांना डस्टबिन देण्यात आले, तर आरोग्य खात्याकडून शौचालयांच्या टाक्यांना असलेल्या बाह्य पाईपला लावण्यासाठी जाळी देण्यात आली. यावेळी सरपंच सचिन चव्हाण, उपसरपंच आकाश चव्हाण, मधुरा आग्रे, सुस्मिता काजवे, अंजली चव्हाण, सायली चव्हाण, दिनेश चव्हाण, महेश घाणेकर, दत्ताराम म्हापरले, वसंत गावडे, संदेश ठीक, सचिन वरवटकर, चंद्रकांत गोमाणे, अरविंद चांदिवडे, शांताराम चांदिवडे, आशा सेविका मनस्वी चव्हाण, आरोग्य मदतनीस संध्या चव्हाण, मेघा चव्हाण, तंटामुक्ती अध्यक्ष मुकेश चव्हाण, हरी चव्हाण, कर्मचारी रणजित पवार, यामिनी चव्हाण उपस्थित होते. यावेळी गावातील सुमारे 340 लाभार्थ्यांनी याचा लाभ घेतला.







