कोट्यवधी रुपयांच्या फसवणूक प्रकरणी अटक
| आगरदांडा | प्रतिनिधी |
मुरुड शहर व ग्रामीण भागातील जनतेस कमीत कमी एक लाख रुपये गुंतवल्यास प्रत्येक महिन्यास दहा हजार रुपये व्याज देण्याचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या प्रसन्न पुलेकर यास मुरुड पोलिसांनी पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली अटक करण्यात येऊन त्याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुरुड भागातील जनतेस कमीत कमी एक लाख रुपये गुंतवल्यास प्रत्येक महिन्यास दहा हजार रुपये व्याज देण्याचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक करण्यास भाग पाडले. त्यानंतर पैसे देण्यास नकार देणाऱ्या प्रसन्न पुलेकर यास मुरुड पोलिसांनी अटक केली आणि त्याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्य तक्रारदार महेश भगत यांनी व त्यांच्यासह 136 जणांनी आपली फसवणूक झाल्याची तक्रार मुरुड पोलीस ठाण्यात नोंदवली होती. सुमारे आतापर्यंत तक्रार दाखल झाल्यानंतर किमान 8 कोटी 1 लाख 25 हजार रुपये फसवणूक झाल्याबाबत मुरुड पोलीस ठाण्यात अनेकांच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या तक्रारीनुसार मुरुड पोलीस प्रसन्न पुलेकर याच्या शोधात होते. मुरुड दिवाणी न्यायालयात एका केस बाबत तो आला असता त्याला मुरुड पोलिसांनी त्यावेळी ताब्यात घेतले. यावेळी मुरुड पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली वरिष्ठ अधिकारी यांचे मार्गदर्शन घेऊन अखेर त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रसन्न पुलेकर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुरुड शहरातील व ग्रामीण भागातील जनतेने जास्त व्याज मिळेल यासाठी पुलेकर याच्याकडे कोट्यवधी रुपये गुंतवले होते. परंतु, अखेर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सर्व लोक एकत्रित येऊन आपली व्यथा पत्रकार परिषद व जिल्हा पोलीस अध्यक्ष रायगड यांच्याकडे मांडून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात यश प्राप्त झाले आहे.






