| माथेरान | प्रतिनिधी |
सलग चार दिवसांपासून माथेरानमध्ये वरुणराजा मनसोक्तपणे पर्जन्यवृष्टी करत असल्याने मंगळवारी (दि.19) हंगामी पर्जन्यमान एकूण 3809.20 मिमी. इतके झाले आहे. गेल्या वर्षी याच दिवशी, म्हणजेच 19 ऑगस्ट 2024 रोजी एकूण पर्जन्यनोंद ही 4472.60 मिमी. इतकी होती. म्हणजेच, गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षीचा हंगामी पर्जन्यमानाची तफावत ही तब्बल 663.40 मिमीने आजमितीस अजूनही कमी आहे.
गेल्या वर्षी 30 सप्टेंबर रोजी एकूण हंगामी पर्जन्यमान 5927.0 मिलिमीटर इतके झाले होते.आज दि.19 रोजीच्या सकाळी साडेआठ वाजताच्या पर्जन्यमापन नोंदीनुसार, माथेरानला गेल्या 24 तासांत तब्ब्ल 254.60 मिलीमीटर इतकी पर्जन्यनोंद झाली. माथेरानला यावर्षीची 24 तासांतील सर्वोच्च पर्जन्यनोंद दिनांक 19 जून रोजी 262 मिलीमीटर इतकी अगोदरच झाली आहे.





