| चणेरा | प्रतिनिधी |
शेतकरी कामगार पक्षाचे रोहा तालुका चिटणीस शिवराम महाबळे यांच्या अध्यक्षतेखाली चणेरा विभागातील पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक पार पडली. आगामी जिल्हा परीषद व पंचायत समिती निवडणुकी करिता बांधणी करणे व बुथनिहाय्य काम करण्यासाठी न्हावे येथील विकास भायतांडेल यांच्या निवासस्थानी ही बैठक संपन्न झाली. या बैठकीत विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
यावेळी जिल्हा मजुर फेडरेशनचे अध्यक्ष हेमंत ठाकूर, जिल्हा चिटणीस मंडळ सदस्य विनायक, वि.वि.ध. कार्यकारी सोसायटीचे अध्यक्ष गोपीनाथ गंभे, उपाध्यक्ष विकास भायतांडेल, धामणे, खांडेकर, तालुका पुरोगामी युवा संघटना अध्यक्ष संतोष दिवकर, खारगाव सरपंच एकनाथ मळेकर, महादेवखार सरपंच संकेत जोशी यांच्यासह राजेश्री शाबासकर, तानाजी म्हात्रे, निळकंठ कासकर, अविनाश पाटील, समीर खरिवले, मनोहर महाबले, समीधा यादव, गितेश भायतांडेल, संदिप भायतांडेल, गिरीश दांडेकर, सुनिल कोल्हाटकर, गणेश वाघीलकर व असंख्य कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.







