| कर्जत | प्रतिनिधी |
कर्जत शहराच्या मध्यवर्ती असलेल्या टेकडीवर मॉर्निंग वॉकसाठी अनेक नागरिक जात असतात कर्जतच्या माजी नगराध्यक्ष विद्यमान नगरसेविका सुवर्णा जोशी या नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकसाठी टेकडीवर गेल्या असता त्यांना एक नवीन प्रजातीचा दुर्मिळ प्राणी बघायला मिळाला त्यांनी त्वरित त्याचा फोटो काढला. फोटो गुगलवर सर्च केला असता ह्या दुर्मिळ प्रजातीच्या प्राण्याचे नाव बलून फ्रॉग (बेडूक) असे आहे. हा बेडूक पर्पल कलरचा असून आकाराने गोल मटक्यासारखा किंवा फुग्यासारखा फुगीर दिसतो, त्याला धोका जाणवतो तेव्हा स्वतःचे शरीर हवेत फुगून आणखीन मोठा होतो, की प्रजाती प्रामुख्याने भारत, नेपाळ आणि बांगलादेशात आढळते, महाराष्ट्रामधील काही जंगलांमध्ये तसेच पश्चिम घाटात हे बेडूक पाहायला मिळतात. जमिनीखाली बिळे करून राहणारे हे बेडूक असून मुख्यतः मुंग्या आणि वाळवी खाऊन जगतात.






