आ. जयंत पाटील यांच्या हस्ते प्रारंभ
भाकरवड | वार्ताहर |
पोयनाड बाजारपेठेतील रस्ता हा तीन टप्प्यात पूर्ण केला जाणार असून, रस्त्याचे काम सुरू असताना कुणीही अडथळा निर्माण करू नये काही अडचण आल्यास थेट माझ्याशी संपर्क साधावा, वाद करू नये, असे आवाहन शेकाप सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी मंगळवारी (9 नोव्हेंबर) पोयनाड येथे केले.
पोयनाड बाजारपेठ अंतर्गत रस्त्याचे भूमिपूजन आ.जयंत पाटील यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले.यावेळी माजी आ.पंडित पाटील,रायगड जि.प. प्रतोद अॅड. आस्वाद पाटील, शेकाप महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील, पं.स.सभापती प्रमोद ठाकूर,सदस्या रचना म्हात्रे, माजी सभापती बाळू शेठ पाटील,पोयनाड सरपंच शकुंतला काकडे, उपसरपंच सचिन पाटील,माजी सरपंच भूषण चवरकर, माजी सरपंच करणशेठ जैन ,व्यापारी अशोसियनचे अध्यक्ष प्रकाश जैन, ग्रा.पं.सदस्य सुनिल पाटील,मोनाली चवरकर, अर्चना चवरकर, कल्पना राऊत, विजेंद्र तावडे,पद्मप्रभ प्रभू देवालयचे मॅनेजिंग ट्रस्टी प्रकाश जैन ,व्यापारी वर्ग आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते
यावेळी बोलताना जयंत पाटील म्हणाले की, पोयनाड बाजारातील मुख्य रस्ता हा अरुंद असल्याने रहदारी सुरु असताना येथे भरपूर प्रमाणात वाहतूक कोंडी होते.तसेच व्यापारी,ग्राहकांना आपल्या सामानाची वाहतूक करण्यासाठी अंतर लांब पडते. या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच नवीन रस्ता तयार केला जाणार आहे.तो तयार करताना वीज, पाणी गटार यांचे योग्यरित्याा विचार करून भूमिगत केला जाणार आहे.जेणेकरुन तेवढी जागा उपलब्ध होईल व सोईस्कर पडेल,असेही ते म्हणाले.
हा रस्ता तीन टप्यात करणार असल्याचे सांगितले प्रथम जैन मंदिर ते सुनील पाटील यांच्या हॉटेल पर्यंत व दुसरा टप्पा सुनिल पाटील हॉटेल पासून भैरवनाथ मंदिर व तिसर्या टप्प्यात भैरवनाथ मंदिर ते पोयनाड नाका असा मार्ग असेल.
आ.जयंत पाटील
महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांनी पोयनाड पोलीस ठाण्याच्या पाठीमागे ग्रामपंचायत हद्दीतील जागेत भव्यदिव्य बास्केटबॉल स्टेडियम, स्विमिंग पूल ,तसेच गार्डन करणार असल्याचे सांगितले. या कार्यक्रमासाठी पोयनाडचे व्यापारी शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते,ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते