1 ठार, 5 जण गंभीर जखमी
। मुंबई । वृत्तसंस्था ।
बंगलोर पुणे महामार्गावरील खंबाटकी घाटातील अपघातासाठी प्रसिद्ध असणार्या एस आकाराचा वळणावर कारचा अपघात झाला आहे. या अपघातात 5 जण गंभीर जखमी झाले असून 1 ठार झाला आहे.
अधिकच्या माहितीनुसार, रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनांची गर्दी होती. याच वेळी खंबाटकी बोगदा उतरल्यानंतर, असणार्या तीव्र उतारावरील एस आकाराच्या वळणावर आपल्या गाडीचा ताबा सुटल्याने ट्रकने समोर चालणार्या गाडीक्रमांक एमएच 12.एसवाय.4324, एमएच 14 एचके 4243, एमएच 12. एसएल. 7667 या तीन वाहनाला धडक दिली. यामध्ये वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.