| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
अलिबाग- पेण मार्गावर श्रीबाग जवळील इंडियन ऑईल पेट्रोल पंपासमोर स्कॉर्पिओ गाडीचा अपघात झाला. कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार चुकीच्या दिशेने जात विजेच्या पोलावर धडकली. ही घटना शनिवारी (दि.4) पहाटेच्या सुमारास घडली. मात्र, कार चालक गाडी रस्त्यातच सोडून गेला. सकाळी ही बाब पोलिसांच्या निदर्शनास येताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत गाडी मालकाचा शोध घेण्यास सुरुवात केली. मात्र, अद्यापपर्यंत मालकाचा शोध लागलेला नाही.







