| उरण | प्रतिनिधी |
शेकापचे चिर्ले ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच सुधाकर उर्फ काका पाटील यांचे सुपुत्र तथा आर्यन ग्रुप आँफ कंपनीचे संचालक समिर पाटील यांनी दिपावली निमित्ताने गावातील 150 नागरीकांना नुकतेच चारधाम यात्रेचे दर्शन घडविण्याचे काम केले आहे. ही यात्रा सफल झाल्याने मोठ्या भक्तिभावाने यात्रे करूंनी सरपंच सुधाकर पाटील व समिर पाटील यांचे आभार व्यक्त केले आहे.
देशात हिंदू धर्मात चारधाम यात्रा, माता वैष्णोदेवी यात्रा, अमरनाथ यात्रा तसेच इतर धर्मियांचीही मोठी तीर्थस्थळे आहेत जिथे आयुष्यात एकदा तरी जाण्याचे बहुतांश ज्येष्ठ नागरिकांचे स्वप्न असते. पुण्यकर्म म्हणून तीर्थक्षेत्री जाण्याची सुप्त इच्छा असते. परंतु, गोरगरीब, सर्वसामान्य कुटुंबातील ज्येष्ठ नागरिक त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे वा कोणी सोबत नसल्याने आणि पुरेशी माहिती नसल्याने अनेक ज्येष्ठ नागरिकांचे तीर्थयात्रा करण्याचे स्वप्न पूर्ण होत नाही. मात्र, आपण ज्या गावात जन्मलो त्या गावाच्या मातीचे ऋण फेडण्याचे काम विविध सामाजिक उपक्रम राबवित शेकापचे चिर्ले ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच सुधाकर उर्फ काका पाटील व यशस्वी उद्योजक समिर पाटील या पितापुत्रांने केले आहे.







