| उरण | प्रतिनिधी |
यु.ई.एस. कॉलेज ऑफ मॅनेजमेंट ॲण्ड टेक्नॉलॉजीच्या राष्ट्रीय सेवा योजना तसेच रेड रिबन क्लब आणि इंदिरा गांधी हॉस्पिटल, उरण यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी (दि.9) एड्स विषयी जनजागृती सत्राचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला इंदिरा गांधी हॉस्पिटलचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. बाबासो कोडेल, महादेव पवार, लॅब टेक्निशियन तृप्ती परजणे, सिनिअर कॉलेजच्या विभाग प्रमुख, शिक्षकवर्ग व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. इंदिरा गांधी हॉस्पिटलचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. बाबासो कोडेल ह्यांनी विद्यार्थ्यांना एड्स विषयी माहिती तसेच समुपदेश व तपासणी कशी होते ह्याबद्दल मार्गदर्शन केले. तसेच हॉस्पिटलतर्फे मोफत एड्सची तपासणी करुन घेऊ शकतात असे सांगितले.







