| खरोशी | प्रतिनिधी |
आजच्या धकाधकीच्या आणि डिजिटल युगात विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकापुरते शिक्षण न देता त्यांना आपल्या परिसराशी, संस्कृतीशी व इतिहासाशी जोडण्याचा अभिनव उपक्रम. पेण तालुक्यातील गागोदे केंद्रातील राजिप शाळा मायणी कोयना शाळेतील विद्यार्थी थेट रिपोर्टरच्या भूमिकेत उतले. आपल्या गावाची ओळख संपूर्ण समाजास करून देत आहेत. प्रत्येक गावाला केवळ भूगोल नसतो, तर त्याला स्वतःचा इतिहास, परंपरा, संस्कृती, वैशिष्ट्ये आणि धार्मिक अध्यात्मिक वारसा असतो, ही संकल्पना या उपक्रमामागे आहे. विद्यार्थ्यांनी गावातील ऐतिहासिक स्थळे, धार्मिक परंपरा, ग्रामदैवत, सण-उत्सव, प्रसिद्ध व्यक्ती, लोककला, व्यवसाय व नैसर्गिक वैशिष्ट्ये यांची माहिती संकलित करून ती प्रभावीपणे सादर केली आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये निरीक्षणशक्ती, संवादकौशल्य, आत्मविश्वास व चिकित्सक विचार सभा धीटपणा संभाषण विकसित होत असून, गावकऱ्यांनाही आपल्या गावाचा अभिमान वाटत आहे. विशेष म्हणजे या उपक्रमाला ग्रामस्थ, पालक व मान्यवरांकडून मोठ्या प्रमाणात पसंती मिळत आहे. मुख्याध्यापक रामकृष्ण भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या उपक्रमाला अमित महागावकर, मंगेश पाटील यांचे सहकार्य लाभले.







