| मुरुड-जंजिरा | प्रतिनिधी |
नवी मुंबई येथील न्यू अंगलर मुंबई संस्थेने मुरुड एकदरा जवळील गायमुख समुद्रकिनारी 100 हुन अधिक स्पर्धकांची 6 वि फिशिंग स्पर्धा आयोजित केली. या स्पर्धेत सकाळी 10 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत समुद्रावर ठरवून दिलेल्या जागेवर फिशिंग रोडने मासेमारी करायची होती. ज्याला सर्वात मोठा व जास्त वजनाचा मासा मिळेल तो प्रथम येणार त्याला 50, 000, 25,000, पंधरा हजारांची रोख पारितोषिके देण्यात आली. संस्थेच्या अटी व नियम लागू असणार अशी माहिती प्रमुख अविनाश मुकादम, यांनी दिली. कल्पेश धुमाळ, नदीम शेख, प्रशांत रानकर, अक्षय दांडेकर, गणेश कोळी, अजय म्हात्रे, हर्षद मळेकर, संकेत पाटील, गणेश पाटील यांनी स्पर्धा घेतली. अविनाश मुकादम म्हणाले, एकदरा गावामागे असणारा गायमुख परिसर फिशिंगसाठी शांत व समुद्राच्या लाटांसोबत येणारा वारा अनुभवत मन एकग्रह करून फिशिंग करण्याचा आनंद काही वेगळाच असतो, अनेकांना फिशिंगची आवड असते. परंतु. चांगले लोकेशन व सर्व सुविधा उपलब्ध नसतात. ॲडव्हेंचर विभागात या स्पर्धेचा समाविष्ट होतो. मासेमारी करताना स्पर्धकाला सहनशील व एकग्रहता गरजेची असते, असे ते म्हणाले.






