| मुंबई | प्रतिनिधी |
राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समितींसाठी 7 फेब्रुवारीला मतदान पार पडले होते. 12 पैकी 7 जिल्हा परिषदांवर भाजपचा झेंडा फडकला आहे. तर 2 ठिकाणी शिवसेना आणि 2 ठिकाणी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा विजय झाला आहे. तर एका जिल्हा परिषदेत शरद पवारांच्या राष्ट्रवादीने विजय मिळवला आहे. यात सिंधुदुर्ग, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव, लातूर, सातारा आणि सोलापूर या जिल्हा परिषदांचा समावेश आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने रायगड आणि रत्नागिरी जिल्हा परिषदेमध्ये सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत. तर, पुणे आणि कोल्हापूर जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादीने विजय मिळवला आहे. सांगलीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने विजय मिळवला आहे.







