आर्ट फेस्टिवल स्पर्धेत प्रथम पारितोषिक; प्रताप सरनाईक यांच्या हस्ते सन्मान
| मुरुड-जंजीरा | प्रतिनिधी |
ठाणे संस्कृती आर्ट फेस्टिवलमध्ये ‘पंढरपूर वारी’ या विषयावर आधारीत छायाचित्रे राज्यभरातून मागवण्यात आली होती. त्यातील हजारो छायाचित्रांतून सुधीर नाझरे यांच्या चित्राला प्रथम क्रमांकचा पुरस्कार प्राप्त झाला. नुकतेच परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते सुधीर नाझरे यांचा सन्मान करण्यात आला. या सन्मान सोहळ्यादरम्यान सरनाईक यांनी नाझरे यांच्या छायाचित्राची प्रशंसा देखील केली. तसेच, सुधीर नाझरे यांच्या ‘फोटो वारी’तून महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन संपुर्ण जगाला घडत आहे.
सुधीर नाझरे गेली 22 वर्षे वृत्तपत्र छायाचित्रकार म्हणून काम करत आहेत. त्यांना महाराष्ट्रातील 43 पुरस्कार प्राप्त झाले असून त्यांचे महराष्ट्रात 12 ठिकाणी छायाचित्रांचे प्रदर्शन झाले आहे. मागील 3 वर्षे जागतिक स्पर्धेत नाझरे यांनी भाग घेण्यास सुरवात केली. आज त्यांच्या विविध चित्रांना 173 सुवर्णपदक प्राप्त झाले आहेत. तसेच, फोटोग्राफी सोसायटी ऑफ अमेरिकाचे अनेक सुवर्णपदक मिळवून महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा असलेले चित्र जगासमोर ते मांडत आले आहे. गेल्यावर्षी रशियात झालेल्या फोटो ऑलिम्पिक 2025 साठी भारतातून 95 छायाचित्रकारांची निवड करण्यात आली होती. त्यात भाताचे 5 छायाचित्रकार निवडले गेले होते. त्यात महाराष्ट्रातून सुधीर नाझरे यांचा देखील समावेश होता. रशियातील फोटो प्रदर्शनात सुधीर नाझरे यांचे पंढरपूर वारीतील 2 छायाचित्र प्रर्दशित झाले होते.

आता नुकतीच ठाणे संस्कृती आर्ट फेस्टिवलमध्ये ‘पंढरपूर वारी’ या विषयावर छायाचित्र स्पर्धा पार पडली. त्यासाठी राज्यभरातून छायाचित्रे मागविण्यात आली होती. त्यातील हजारो छायाचित्रांतून सुधीर नाझरे यांच्या छायाचित्राला प्रथम क्रमांकचा पुरस्कार प्राप्त झाला. त्याचा सन्मान सोहळा सोमवारी (दि.9) ठाणे उपवन आर्ट गॅलरी येथे पार पडला. यावेळी सुधीर नाझरे यांना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते 11 हजार रोख व सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. आळंदी व देहू येथून माऊलींची व तुकारामांची पालखी वारकरी पायी चालत पंढरपूरला जातात. त्यावेळचे जिवंत अनुभव टिपण्याचे काम सुधीर नाझरे यांनी केले आहे. गेली 15 वर्षे वारीचे छायाचित्रण करत असल्याने वारीतील प्रत्यक्ष क्षणाचे फोटो त्यांच्या संग्रही आहेत. त्यामुळे यावेळी ठाणेकरांना वारीचे सुंदर दर्शन ठाणे उपवन आर्ट गॅलरी येथे घडले. या प्रदर्शनाला 4 दिवसांत 3 लाख ठाणेकरांनी भेट देऊन पांडुरंगाची वारीचा आनंद घेतला. यावेळी उर्वरित छायचित्रकार सुभाजित मुखर्जी, हरी मुलमुले, अक्षय चंद्रकांत येवगे, महेश अंबरे, प्रशांत एस. खरोटे, सोहम बावस्कर, जय मावळे व शरद इरागोंडा पाटील यांचा देखील सन्मान करण्यात आला.






