| महाड | प्रतिनिधी |
महाड एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीतील हरवलेल्या मोबाईल प्रकरणांचा प्रभावी तपास करत पोलिसांनी एकूण 6 मोबाईल हस्तगत करण्यात यश मिळवले आहे. हस्तगत करण्यात आलेल्या मोबाईलची एकूण किंमत 2 लाख 40 हजार रुपये असून संबंधित तक्रारदारांना ते परत करण्यात आले आहेत. गेल्या काही महिन्यांमध्ये विविध नागरिकांचे मोबाईल हरवल्याच्या तक्रारी पोलीस ठाण्यात दाखल झाल्या होत्या. या प्रकरणांचा तपास सहायक पोलीस निरीक्षक जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली डी. बी. बल्लाळ यांनी केला. सीईआयआर पोर्टलच्या माध्यमातून तांत्रिक विश्लेषण करत हरवलेले मोबाईल शोधून काढण्यात आले. यातील प्रत्येक मोबाईलची अंदाजे किंमत 40 हजार रुपये असून एकूण 2 लाख 40 हजार रुपयांचे मोबाईल संबंधित तक्रारदारांच्या ताब्यात देण्यात आले. मोबाईल परत मिळाल्याने नागरिकांनी पोलिसांचे आभार व्यक्त केले.






