चालक ठार, रेल्वे सेवा 9 तास ठप्प
जेएनपीटी | वार्ताहर |
जेएनपीटी – गव्हाण फाटा उड्डाण पूलावरुन मार्गक्रमण करणारा कंटेनर टेलर रेल्वे रुळावर पडला आहे.या दुदैवी अपघातात टेलर चालक जागीच मृत्यू पावला आहे. सदर अपघात हा शनिवारी(दि20) रात्री 9-30 च्या सुमारास घडला असून या अपघातामुळे जेएनपीटी बंदराकडे जाणारी मालवाहू रेल्वेसेवा 9 तास ठप्प झाली होती.
जेएनपीटी बंदर व नवीमुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ येथील वाहतूक व्यवस्था सुरळीत होण्यासाठी जेएनपीटी, सिडको आणि राज्य, केंद्र शासन यांनी उरण, नवीमुंबई परिसरात मोठ्या प्रमाणात उड्डाण पूलाची उभारणी करण्यास सुरुवात केली आहे.परंतु या तीन ही व्यवस्थापनाच्या डोळे झाक कारभारामुळे उड्डाण पूलावर अपघाताची संख्या बळावली आहे.त्यात नव्याने वाहतूकीसाठी सुरु करण्यात आलेल्या उड्डाण पूलावरुन शनिवारी ( दि20) रात्री 9-30 च्या सुमारास मालाची वाहतूक करणारा कंटेनर टेलर पलटी होण्याची दुदैवी घटना घडली.
सदर मालानी भरलेला कंटेनर टेलर पुलावरुन 30 ते 40 फुटांवरून जेएनपीटी बंदराच्या दिशेने जाणार्या रेल्वे रुळावर पडला.या झालेल्या अपघातात कंटेनर टेलर चालकांचा जागीच मुत्यू झाल्याची घटना घडली आहे. अपघातामुळे जेएनपीटी बंदराकडे जाणारी मालवाहू रेल्वेसेवा 9 तास ठप्प झाली होती.या अपघाताची माहिती मिळताच पोलीस, वाहतूक पोलीस यंत्रणा घटना स्थळी तात्काळ दाखल झाली.परंतु या परिसरातील अंधारामुळे रेल्वे रुळ मोकळा करण्यासाठी तसेच तपास कार्यात अडथळा निर्माण झाला होता.







