एनएमएमएस परीक्षेत ठरले अव्वल
। मुरुड जंजिरा । प्रतिनिधी ।
केंद्र शासनाच्या शाळेतील आर्थिक दुर्बल घटकांमध्ये मोडणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांसाठी एनएमएमएस परीक्षेचे नियोजन केले जाते. आर्थिक दुर्बल घटकांमधील मुलांना शैक्षणिक प्रेरणा व आर्थिक मदत होण्याच्या दृष्टिकोनातून ही परीक्षा देश पातळीवर घेण्यात येते. पीटसई येथील अशोक ल लोखंडे विद्यालय हे ग्रामीण व डोंगराळ भागातील विद्यालय असताना देखील या शाळेतील 14 विद्यार्थी या परीक्षेत बसले होते. त्यापैकी सहा विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यामुळे या शाळेचे सर्वत्र कौतुक होत आहे. येथील शिक्षक वृंदांनी मुख्याध्यापक अरुण खुळपे यांच्या प्रमुख मार्गदर्शनखाली एनएमएमएस परीक्षेसाठी विशेष मेहनत घेत हे यश प्राप्त केले आहे. ही परीक्षा डिसेंबर 2025 मध्ये घेण्यात आली होती. या परीक्षेचा नुकताच निकाल लागला असून येथील विद्यार्थी अव्वल ठरले आहेत.
उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे चेअरमन खेळूशेट वाजे व विद्यालयाचे मुख्याध्यापक अरुण खुळपे, सर्व मार्गदर्शक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. पुढील स्पर्धा परीक्षांसाठी शुभेच्छा दिल्या. विशेष बाब म्हणजे म्हणजे तसेच गेल्या वर्षी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थिनींकडून यावर्षी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थिनींचा सत्कार सुद्धा करण्यात आला.







