। खोपोली । वार्ताहर ।
खोपोलीतील भाई प्रभाकर पाटील सहकारी पतसंस्थेतील ठेवीदारांमध्ये उलटसुलट चर्चेला उधाण आले असून याचा संबंध थेट शेकाप नेते आ.जयंत पाटील यांच्या कुटुंबियांशी जोडला जात आहे मात्र पतसंस्थेचे नाव भाई प्रभाकर पाटील असले तरी आ.जयंत पाटील कुंटुबांशी तसेच रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेशी दुरान्वये संबंध नसल्याचा खुलासा खालापूर नगरपंचायतीच्या माजी नगराध्यक्षा शिवानी जंगम यांनी केला आहे. खोपोली शहरात भाई प्रभाकर पाटील यांच्या नावाने सहकारी पतसंस्था सुरू आहे.व्यापार्यांसह अनेक नागरिकांनी आपले पैसे विश्वासाने ठेवले आहेत. कोरोनानंतर ठेवीदार आपले पैसे परत मिळविण्यासाठी गेले असता उडवाउडवीची उत्तरे मिळत असल्यामुळे ठेवीदारांमध्ये उलटसुलट चर्चेला उधाण आले असून सदर भाई प्रभाकर पाटील सहकारी पतसंस्थेला आ.जयंत पाटील यांचे नाव असल्यामुळे सदर पतसंस्था पाटील यांची असल्याचा गैरसमज आहे. मात्र भाई प्रभाकर पाटील असले तरी आ.जयंत पाटील कुंटुंबांशी तसेच रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेशी दुरान्वये संबंध नसल्याचा खुलासा शिवानी जंगम यांनी केला आहे. सहकार क्षेत्रात पाटील कुटूंबाचे नाव आदराने आणि विश्वासाने घेतले जात असतानाच आमच्या नेत्यांचे नाव बदनाम केल्यास ते खपवून घेणार नसल्याचा इशाराही शिवानी जंगम यांनी दिला आहे.