| भाकरवड | प्रतिनिधी |
अंगणवाडी केंद्र भाकरवड येथे नॅशनल लेव्हल इ आकार रॉकेट लर्निंग कमिटी, बालविकास प्रकल्प अधिकारी यांनी भेट दिली. यावेळी नॅशनल लेव्हल इ आकार रॉकेट लर्निंग हून मिस्टर लुकेन, मिस रुबेका, मिस सुप्रिया, बालविकास प्रकल्प अधिकारी अलिबाग शर्मिला पाटील (पिंगळे), परिक्षिका सामिया पेरेकर, शाळा व्यवस्थापन समिती शिक्षण तज्ञ अरुण राऊत, अंगणवाडी सेविका वैशाली पाटील, समिता पाटील यांच्या सह विद्यार्थी पालक, ग्रामस्थ आदी मान्यवर उपस्थित होते.
या सर्वांचे स्वागत शाळेच्या वतीने अंगणवाडी सेविका, शिक्षण तज्ञ, यांच्या हस्ते करण्यात आले. इ आकार अभ्यासक्रमाद्वारे मुलांना कशा पद्धतीने शिकवले जाते. दोन ते अडीच तास अंगणवाडीतील कृतीचे निरीक्षण करून, मुलांसोबत प्रत्यक्ष कृती करून अंगणवाडी सेविका, मदतनीस पालक यांच्याशी संवाद साधला. मुलांच्या इ आकार अभ्यासक्रमाच्या कृती मुलांचा वहीवरील अभ्यास, पेपर, भाषणे, बडबडगीते पाहून त्यांनी मुलांना शुभेच्छा दिल्या. मुलांच्या पालकांशी संवाद साधून शिक्षण मातृभाषेतून असणे गरजेचे आहे याचे महत्व सांगितले.






