| पनवेल | प्रतिनिधी |
पनवेल जवळील जुना मुंबई-पुणे महामार्गावरील कोन बिट पोलीस चौकी समोरून जाणाऱ्या ट्रेलरला स्कुटी चालकाने समोरून धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात स्कुटीवरील दोघे गंभीररित्या जखमी होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, असद मेमन शमशद (19) व मुस्कान संजय सिंग (20) असे मृतांचे नाव आहे. हे दोघे स्कुटीवरून जात असताना स्कुटी चालकाचा स्कुटीवरचा ताबा सुटला आणि तो थेट समोरून येणाऱ्या भरधाव ट्रेलरला धडकला. हा अपघात एवढा भीषण होता की, दोघेही त्यात गंभीर रित्या जखमी झाले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची नोंद पनवेल तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.







