ऐतिहासिक जंजिरा किल्ला पाहण्यासाठी शुल्क माफ
। आगरदांडा । प्रतिनिधी ।
मुरुड राजपुरी येथील समुद्रात असणारा ऐतिहासिक जंजिरा किल्ला पाहण्यासाठी रोज शेकडो पर्यटक ये-जा करित असतात. येणाऱ्या पर्यटकांकडून पुरातत्व विभागाकडून प्रवेश शुल्क आकारले जाते. मात्र जागतिक महिला दिनादिवशी हे प्रवेश शुल्क महिलांसह पुरुषांना माफ करुन महिलांना एक अनोखी भेट देण्यात आली आहे. तसेच, अलिबाग येथील कुलाबा किल्ला, रायगड किल्ला, कुडा लेणी या ठिकाणी ही महिलादिनाच्या दिवशी प्रवेश शुल्क माफ असणार आहे. तरी जास्तीत जास्त महिलांनी या संधीचा फायदा घ्यावा, असे आवाहन पुरातत्व सहाय्यक संवर्धक बजरंग येलीकर यांनी केले आहे.







