। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
पश्चिम आशियातील तणाव वाढतच चालला आहे. इस्रायल आणि अमेरिका इराणवर हल्ले करत आहेत, तर इराण आखाती देश आणि इस्रायलवर प्रत्युत्तर देत आहे. बुधवारी इस्रायलने इराणचे गुप्तचरमंत्री इस्माइल खतीब यांना हवाई हल्ल्यात ठार केल्याचा दावा केला. गेल्या दोन दिवसांत इराणचा हा तिसरा वरिष्ठ अधिकारी मारला गेला आहे. याआधी, इराणने केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात तेल अवीवजवळ दोन जणांचा मृत्यू झाला होता.







