जिल्हाधिकारी किशन जावळे यांची उपस्थिती
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
पर्यावरण पुरक व्यावसाय म्हणून बांबू व्यावसायाकडे पाहिले जाते. हा व्यवसाय अधिक वृंध्दीगत करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. बांबूमार्फत परंपरागत हस्तकला काम करणाऱ्या अलिबाग तालुक्यातील 50 व्यक्तींना टूल्स कीटचे वाटप करण्यात आले. त्यामध्ये कटर, ड्रील मशीन आदी साहित्यांनी भरलेला कीट रायगडच्या जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या हस्ते वाटप केले.
यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, जिल्हा उद्योग केंद्रातील हरालय्या, वरिष्ठ सहाय्यक संचालक चंद्रशेखर सिंग, व्यवस्थापक स्वप्ना राऊत आदींसह लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. राष्ट्रीय हस्तकला विकास कार्यक्रमांतर्गत आयुक्त हस्तकला कार्यालय वस्त्र मंत्रालय व भारत सरकार, महाराष्ट्र स्टेट हॅन्डलूम फेडरेशन लिमिटेडच्यावतीने अलिबाग तालुक्यातील नागाव, थळ, पोयनाड, रेवस, साळाव, रेवदंडा येथील लाभार्थ्यांना कीट वाटप करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी जावळे, नेहा भोसले यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.






