| रसायनी | प्रतिनिधी |
ग्रुप ग्रामपंचायत वासांबे मोहोपाडा आणि अल्केल अमाईंन्स यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामपंचायतीच्या शिवांजली इमारतीच्या सभामंडपात महिला सक्षमीकरणाकरिता शिलाई प्रशिक्षणास सोमवार, दि.20 पासून सुरुवात करण्यात आली आहे. शिलाईकाम शिकून महिला आपल्या स्वत:चा रोजगार उपलब्ध करू शकतील, असे सांगण्यात आले. प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या सहा महिलांना मोफत शिलाई मशीन देण्यात येणार आहे. महिला सक्षमीकरण करण्याचा उपक्रमाचे महिलावर्गातून कौतुक होत आहे.







