| नागोठणे | प्रतिनिधी |
नागोठण्यातील आंगरआळी येथील रहिवासी चंद्रकांत लक्ष्मण कामथे (78) यांचे बुधवारी (दि.27) त्यांच्या राहत्या घरात निधन झाले. अलिबाग येथील जिल्हा न्यायालयातील जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे मुख्य बचाव अधिवक्ता ॲड. शेखर कामथे यांचे ते वडील होत. चंद्रकांत कामथे यांच्या अकस्मात निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. चंद्रकांत कामथे यांच्या पश्चात पत्नी, एक विवाहित मुलगा, तीन विवाहित मुली, सुन, जावई, नातवंडे यांच्यासह मोठा परिवार आहे. त्यांचे दशक्रिया विधी शुक्रवार दि.5 जून रोजी उद्धर-सुधागड येथे, तर उत्तरकार्य रविवार दि.7 जून रोजी आंगरआळी -नागोठणे येथे त्यांच्या राहत्या घरी होणार असल्याचे कामथे कुटुंबियांकडून सांगण्यात आले आहे.






