। पाली/गोमाशी । प्रतिनिधी ।
रायगड जिल्हा परिषद सदस्य अविनाश नलावडे त्यांचे सहकारी प्रकाश जंगम, सोनालाल माली यांच्यावर गुरुवारी (दि. 4) अहिल्यानगर मधील रनगाव बायपास चौकात भर दिवसा जीवघेणा हल्ला करण्यात आला.
हा हल्ला त्याच्याकडे गेली चार ते पाच वर्षे काम करणाऱ्या अक्षय मोहिते आणि राजू मोहिते या कामगारांना त्यांच्या आगामी कामाचे पैसे देण्यासाठी ते गेले असताना ही घटना घडली. त्या दोघांनी तसेच त्यांच्या मित्राच्या साथीने जीवघेणा हल्ला करून दरोडा टाकला असा आरोप नलावडे यांनी केला आहे. या हल्ल्यात जिल्हा परिषद सदस्यांच्या डोक्यावर लोखंडी सळईने वार केले आहेत, तसेच त्याच्या सहकार्याचा डोळा पूर्णपणे निकामी केला आहे. या सर्व जखमींवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या हल्लेखोराने सोन्याची चैन, ब्रेसलेट, अंगठी असा एकूण पंधरा तोळे सोने ऐवज मोबाईल तसेच पन्नास लाख रुपयांची रक्कम, लंपास केली आहे. जिल्हा परिषद सदस्य अविनाश नलावडे यांच्या बरोबर संपर्क साधला असता त्याने असे सांगितले की या हल्ले खोराना लवकरात लवकर पकडून आमचा चोरलेला मुद्दे माल मिळवून द्यावा. तसेच त्यांच्यावर कायदेशीर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी अहिल्यानगर पोलीस निरीक्षक यांच्याकडे करण्यात आली आहे.







