| चिरनेर | प्रतिनिधी |
उरण शहरातील उरण एज्यूकेशन सोसायटी विद्यालयात विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त नशामुक्ती संदर्भात जनजागृती करण्यात आली. यासाठी शेवा बंदर विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त किशोर गायके यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी (दि.27) एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी नशामुक्तीच्या अनुषंगाने उपस्थित विद्यार्थी विद्यार्थिनींना अंमली पदार्थामुळे होणारे दुष्परिणाम, सायबर गुन्हे, महिला विषयक गुन्हे, गुड अच बॅड टच या विषयावर मार्गदर्शन करून नशा मुक्ती संदर्भात शपथ देण्यात आली. उरणचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक हनिफ मुलाणी, पो.नि.राहुल काटवाणी अंमली पदार्थ विरोधी नवीमुंबईचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीप निगळे, दर्शन नाईक यांच्यासह शाळा समितीचे पदाधिकारी, मुख्याध्यापक आणि 450 हून अधिक विद्यार्थी, विद्यार्थिनी या अंमली पदार्थ विरोधी नशामुक्ती जनजागृती कार्यक्रमासाठी उपस्थित होते.







