| कर्जत-वेनगाव | प्रतिनिधी |
खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांना जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या घटनेचा राज्यभरातून तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे. त्यामुळे त्यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी जोर धरत आहे. याच पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यातील पत्रकार संघटनांनी देखील आक्रमक भूमिका घेतली आहे. रायगड प्रेस क्लब संलग्न कर्जत प्रेस क्लबच्यावतीने कर्जत, नेरळ आणि कर्जत उपयोगी पोलीस कार्यालयात निवेदन सादर करून संजय दिना पाटील यांच्यावर तात्काळ गुन्हा नोंद करण्याची मागणी करण्यात आली आहे. यावेळी रायगड प्रेस क्लबचे कार्यक्षम संजय मोहिते, सचिव दरवेश पालकर, ज्येष्ठ पत्रकार विजय मांडे, कर्जतप्रेस क्लबचे अध्यक्ष गणेश पवार, संजय अभंगे, विद्यानंद हबले, गणेश मते, विलास श्रीखंडे, कांता हबले, ज्ञानेश्वर बागडे, विपुल माळी, गणेश पुरोहित आदींसह कर्जत प्रेस क्लबचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.







