| पनवेल | प्रतिनिधी |
हीट अँड रन प्रकरणातील तळोजा पाचनंद येथील कारचालक अरफात साबीर पटेल (22) याला तळोजा पोलिसांनी अटक केली आहे. अरफात पटेल यांनी इलेक्ट्रिक चारचाकी गाडी भरधाव वेगाने चालवून दि.7 जुलै रोजी स्कुटी, टेम्पो आणि मोटरसायकलला धडक दिली होती. या धडकेत नदीम खान याचा जागीच मृत्यू झाला. तर, इतर पाच जण जखमी झाले होते. त्यानंतर घटनास्थळावरून अरफात साबीर पटेल पळून गेला होता. मात्र, तळोजा पोलिसांनी त्याला अटक केली आहे.






