| पनवेल | प्रतिनिधी |
समाजातील गरजू, वंचित आणि दुर्बल घटकांच्या सेवेसाठी सातत्याने कार्य करणाऱ्या कोमल भोईर यांना सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल घेत “व्हिजनरी डॉक्टरेट ऑनर इन सोशल वर्क“ हा प्रतिष्ठेचा मानद डॉक्टरेट सन्मान प्रदान करण्यात आला आहे. विविध सामाजिक उपक्रमांद्वारे मानवतेची सेवा, समाजाप्रती असलेली निष्ठा आणि लोककल्याणासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची नोंद घेऊन हा सन्मान बहाल करण्यात आला आहे. कोमल मोहनिश भोईर यांनी अनेक वर्षांपासून गरजू कुटुंबांना मदतीचा हात देणे, पूरग्रस्तांना मदत, दिव्यांगांना व्हीलचेअर वाटप, आर्थिकदृष्ट्या दुर्बल मुलांना शैक्षणिक सहाय्य, महिलांसाठी आरोग्य जनजागृती उपक्रम तसेच वृद्धाश्रमांमध्ये सेवा अशा विविध सामाजिक कार्यातून समाजात वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या सेवाभावी वृत्तीमुळे अनेक गरजूंच्या जीवनात सकारात्मक बदल घडून आले असून, समाजहितासाठी केलेल्या या सातत्यपूर्ण कार्याची राष्ट्रीय स्तरावर दखल घेत त्यांना हा मानाचा सन्मान प्रदान करण्यात आला आहे.







