। अलिबाग । प्रतिनिधी ।
स्पर्धा विश्व अकॅडमी अलिबाग या ठिकाणी ॲड. निहा अनिस राऊत यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून व्यसनमुक्ती संदर्भात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी लायन्स क्लब श्रीबागच्या एम.जे.एफ. ॲड. निहा अनिस राऊत, डी. सी. ग्लोबल क्लॉज यांनी उपस्थित विद्यार्थ्यांची संवाद साधला. त्यांनी दारू, तंबाखू या व्यसनांच्या दुष्परिणामाविषयी माहिती देत प्रत्येकाने व्यसन चांगल्या गोष्टीचे करा, अभ्यासाचे करा, व्यायामाचे करा, एकमेकांना मदत करण्याचे करा, असे बहुमोल मार्गदर्शन केले. तर महाराष्ट्राच्या गायिका ॲड. कलाताई पाटील यांनी भगवत गीतेचे महत्व उपस्थित युवक- युवतींना सांगितले. या कार्यक्रमास प्रिझम सामाजिक विकास संस्थेच्या अध्यक्षा तथा राष्ट्रीय युवा पुरस्कारार्थी तपस्वी गोंधळी, स्पर्धा विश्व अकॅडमीच्या संचालिका सुचिता साळवी व स्पर्धा विश्व अकॅडमीचे विद्यार्थी उपस्थित होते.







