| आगरदांडा | प्रतिनिधी |
मुरूड शहरातील लक्ष्मीखार येथील आयेशा पुरकर हिने पुणे विद्यापीठांतर्गत अजिंक्य डी.वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथील बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग शाखेत 97 टक्के गुण मिळवुन उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या उज्ज्वल यशामुळे आयेशा हिने केवळ महाविद्यालयाचे नव्हे, तर मुरुड शहराच्या शैक्षणिक लौकिकात देखील मानाचा तुरा रोवला आहे. आयेशा हिने कठोर परिश्रम, सातत्यपूर्ण अभ्यास, वेळेचे प्रभावी नियोजन आणि जिद्दीच्या जोरावर हे यश प्राप्त केले आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डेटा सायन्ससारख्या आधुनिक व स्पर्धात्मक शाखेत मिळवलेले हे यश इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. या नेत्रदीपक कामगिरीबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक, पालक, नातेवाईक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदनाचा वर्षाव केला असून, भविष्यातही तो शैक्षणिक व व्यावसायिक क्षेत्रात अशीच अल्लेखनीय भरारी घेईल, असा विश्वास आयेशाचे वडील शहबाज पुरकर यांनी व्यक्त केला.







