| नवीन पनवेल | प्रतिनिधी |
कोंडीची वाडी येथे पाण्यात बुडून सोळा वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना 30 जुलै रोजी सायंकाळी घडली. अभिषेक एलिया ढालवाणी (रा. अय्यप्पा मंदिराच्या पाठीमागे, सुकापूर) असे मृत तरुणाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 30 जुलै रोजी वाजेगावच्या पुढे बाबदेववाडी आणि कोंडीची वाडी ओव्हर ब्रिजखाली नदीच्या पात्रामध्ये अभिषेक ढालवाणी आणि त्याचे चार मित्र फिरण्यासाठी गेले होते. कोंडीची वाडी ब्रिजच्या खालील नदीपात्रात पोहण्यासाठी ते उतरले. अभिषेकला पोहता येत नव्हते. यावेळी पाण्यात त्याचा पाय घसरला आणि तो बुडाला. चारही मित्रांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती पनवेल तालुका पोलीस आणि अग्निशामक दलाला देण्यात आली. पोलीस आणि अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अभिषेकला बाहेर काढले. मात्र, त्याचा मृत्यू झाला होता.







