| रायगड | क्रीडा प्रतिनिधी |
रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन 30 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5.30 वाजता पेण येथील लक्ष्मीनारायण हॉल म्हाडा कॉलनी येथे केले आहे. सदरची वार्षिक सर्वसाधारण सभा आरडीसीएचे अध्यक्ष अनिरुद्ध पाटील यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात येणार आहे .सदर सभेसाठी आरडीसीएचे सचिव प्रदिप नाईक यांनी जाहीर केलेल्या नोटीस नुसार सभेमध्ये मागील सभेचे इतिवृत्त वाचून केलेले ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात येतील. ऑक्टोबर 2026 ते जून 2027 पर्यंत आरडीसीएच्या वतीने घेण्यात येणाऱ्या सर्व मुलामुलींच्या विविध वयोगटातील निवड चाचणी स्पर्धाचे नियोजन सर्वांच्या सहमतीने सभेत करण्यात येणार आहे.गतवर्षी आरडीसीए तर्फे महाराष्ट्र क्रिकेट अससोसिएशन व बीसीसीआयच्या स्पर्धेतील सामने जिल्ह्यातील विविध मैदानांवर यशस्वीरीत्या खेळविण्यात आल्याची माहिती सभासदांना दिली जाणार आहे. येणाऱ्या क्रिकेट हंगामात आरडीसीए खुल्या गटातील मुलांच्या व मुलींच्या रायगड जिल्हा क्रिकेट अससोसिएशन प्रीमिअर लीग व विविध वयगटातील निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन करण्या विषयाची माहिती सचिव प्रदिप नाईक सभेला देणार आहेत.सदरच्या सर्वसाधारण सभेसाठी उपस्थित राहण्याचे अवाहन सचिव प्रदीप नाईक यांनी केले आहे.







