। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
पश्चिम आशियातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर ओमानच्या किनारपट्टीजवळ भारतीय जहाजावर झालेल्या हल्ल्यात गुजरातमधील एका खलाशाचा मृत्यू झाला आहे. सोमवारी (दि.2) होर्मूझच्या सामुद्रधुनीत भारतीय ध्वज असलेल्या ‘एमएसव्ही अल जूसुफी’ या मालवाहू जहाजावर हल्ला करण्यात आला. या जहाजावरील 14 भारतीय कर्मचाऱ्यांपैकी 13 जणांची ओमानच्या तटरक्षक दलाने सुखरूप सुटका केली. मात्र, जखमी झालेल्या एका खलाशाचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाला. मृत खलाशाचे नाव गंधार नाहिम अजिज असून ते गुजरातचे रहिवासी होते.







