• Login
Sunday, November 1, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

महासत्तांना 72 तासांचा हाय अलर्ट

Sanika Mhatre by Sanika Mhatre
November 1, 2026
in sliderhome, नवी दिल्ली
0 0
0
महासत्तांना 72 तासांचा हाय अलर्ट
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

जीवनावश्यक वस्तूंचा साठा करण्याचा सल्ला

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

जगभरातील महासत्ता आपल्या नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीसाठी तयार राहण्याचा सल्ला देत आहेत. त्यांनी ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी, जपान आणि युरपीय महासंघासह अनेक देशांनी आपल्या नागरिकांना किमान 72 तास पुरेल इतका अन्न, पिण्याचे पाणी, औषधे आणि जीवनावश्यक वस्तूंचा साठा करून ठेवण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे ज्या देशात अत्याधुनिक शस्त्रसाठा, शक्तीशाली सैन्य आणि प्रगत तंत्रज्ञान आहे त्या देशांना आपल्या नागरिकांना संकटांना तयार राहण्याचा सल्ला का देत आहेत? काहीतरी मोठं घडणार आहे का? जग पुन्हा एकदा महायुद्धाच्या दिशेने जात आहे का? की एका मोठ्या सायबर हल्ल्याची, नैसर्गिक आपत्तीची किंवा जागतिक पुरवठा साखळी कोलमडण्याची भिती जगाला सतावत आहे का? आणि असे असेल तर त्याचा भारतावर काय परिणाम होणार, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहे.

जगात सध्या वेगळ्याच घडामोडी पाहायला मिळत असून, युरोपपासून आशियापर्यंत तब्बल 17 देशांनी आपल्या नागरिकांना सद्यस्थितीत घरात किमान तीन दिवस पुरेल इतका अन्नधान्य आणि जीवनावश्यक वस्तूंचा साठा ठेवण्याचे आवाहन अनेक सरकारांनी केले आहे. काही देशांनी तर सात ते दहा दिवसांचा साठा ठेवण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे जग एखाद्या मोठ्या संकटाच्या तयारीत आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. ब्रिटनने नागरिकांना किमान तीन दिवस पुरेल इतका अन्न आणि पाण्याचा साठा ठेवण्यास सांगितले आहे. जपाननेही तीन दिवसांचा साठा ठेवण्याचा सल्ला दिला असून, शक्य असल्यास तो एका आठवड्यापर्यंत वाढवण्याचे आवाहन केले आहे. बेल्जियम, फ्रान्स, नेदरलँड्स आणि फिनलंड या देशांनी किमान 72 तासांची तयारी ठेवण्यास सांगितले आहे. तर, स्वीडन आणि नॉर्वेने नागरिकांना सात दिवस स्वतःच्या गरजा भागवता येतील, अशी व्यवस्था करण्याचा सल्ला दिला आहे. तैवानमध्येही नागरिकांना एका आठवड्याच्या गरजेपुरत्या वस्तू घरात ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मात्र, या सूचनांचा अर्थ जगात युद्ध सुरू होणार आहे किंवा एखादी मोठी आपत्ती येणार आहे, असा होत नाही. सरकारांनी कोणत्याही युद्धाची अधिकृत घोषणा केलेली नाही. परंतु, भविष्यात अचानक संकट निर्माण झाल्यास मदत पोहोचण्यास वेळ लागू शकतो, याची जाणीव सरकारांना झाली आहे. त्यामुळे सुरवातीचे किमान 72 तास नागरिकांनी स्वतःची आणि कुटुंबियांची काळजी घेता यावी हा या सल्ल्यामागची उद्देश असल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, वीजपुरवठा अनेक दिवस खंडित झाला तर एटीएम बंद पडू शकतात. ऑनलाईन पेमेंट सेवा ठप्प होऊ शकतात. मोबाईल नेटवर्क बंद पडू शकते. पाणीपुरवठा विस्कळीत होऊ शकतो. वाहतूक आणि पुरवठा व्यवस्था कोलमडल्यास सुपरमार्केटमधील वस्तूही मिळणे अवघड होऊ शकते. अशावेळी नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो. युक्रेनमधील युद्ध, कोरोना आणि जगभरात वाढणाऱ्या नैसर्गिक आपत्तींचा अनुभव लक्षात घेऊन अनेक देशांनी ही खबरदारी घेतली आहे.

भारतावरही संकट?
भारतीय प्रशासनाने किंवा सरकारने नागरिकांना असा 72 तासांचा विशेष साठा करण्याबाबत कोणताही मोठा आदेश दिलेला नाही. जर जागतिक स्तरावर पुरवठा साखळी विस्कळीत झाली, कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या किंवा सायबर हल्ल्यांमुळे जागतिक बाजारपेठेत अस्थिरता आली, तर भारतात आयात-निर्यात प्रभावित होऊन महागाई किंवा ऊर्जा संकटाचा सामना करावा लागू शकतो. तसेच, भारताच्या डिजिटल पायाभूत सुविधांवरही सायबर हल्ल्यांचे धोके कायम असतात, यामुळे बँकिंग आणि इंटरनेट सेवांवर परिणाम होऊ शकतो.
नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन
पिण्याचे पाणी, खाद्यपदार्थ, आवश्यक औषधे, टॉर्च, अतिरिक्त बॅटरी, पॉवर बँक, रेडिओ आणि काही रोख रक्कम घरात ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे. या वस्तू एकाच वेळी खरेदी करण्याऐवजी हळूहळू साठवून ठेवाव्यात. घाबरून जाऊन मोठ्या प्रमाणात खरेदी करण्याची गरज नाही. हा इशारा घाबरवण्यासाठी नसून नागरिकांना सतर्क करण्यासाठी आहे. संकट कधी आणि कोणत्या स्वरूपात येईल, हे सांगता येत नाही. मात्र, अशा वेळी किमान काही दिवस स्वतःच्या गरजा भागवता येतील, एवढी तयारी असणे गरजेचे आहे.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapernew delhi newsnewsnews indiaonline marathi newssocial media newssocial news
Previous Post

सोमवारी कर्जत तालुका बंद ठेवा

Next Post

रामलीलावरून ‌‘इंडिया‌’चा एल्गार

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

सोमवारी कर्जत तालुका बंद ठेवा
sliderhome

सोमवारी कर्जत तालुका बंद ठेवा

November 1, 2026
sliderhome

तडीपार गुन्हेगाराकडून गांजा विक्री

November 1, 2026
रेवदंड्यात मटका अड्ड्यावर धाड; दोघांवर गुन्हा दाखल
sliderhome

पाटणसई येथील मटका अड्ड्यावर छापा

November 1, 2026
sliderhome

सरकारी कार्यालयांकडून मालमत्ता कर थकीत

November 1, 2026
sliderhome

पाच कोटींच्या जमिनीसाठी तोतयांचा डाव

November 1, 2026
बोरज येथील घर भस्मसात
sliderhome

बोरज येथील घर भस्मसात

November 1, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« Oct    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?