। मुंबई । प्रतिनिधी ।
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्य सुनील तटकरे यांनी राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबद्दल मोठं भाष्य केलं आहे. अजितदादा असते तर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस आज एकत्र दिसले असते, असा सुनील तटकरे यांनी दावा केला आहे. इतकंच नाही तर अजित पवार यांच्या निधनामुळे ही चर्चा मागे पडली, मात्र अजित पवार असते तर जी 12 फेब्रुवारीही तारीख जी सांगितली जाते ती निश्चित झाली असती आणि दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र दिसल्या असत्या, असंही सुनील तटकरे म्हणाले. नुकतंच राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल यांनी शरद पवार यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली होती. या भेटीनंतर प्रफुल पटेल यांनी आम्ही राजकीयदृष्ट्या दुरावलो आहोत पण मनाने नाहीत असं वक्तव्य केलं होतं. आता यानंतर सुनील तटकरे यांनी विलिनीकरणावर भाष्य केल्याने, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.





