| अलिबाग | प्रतिनिधी |
रोहा तालुक्यातील सामाजिक नेते व्ही. टी. देशमुख यांच्या कन्या स्नेहा शिरिष आंब्रे यांचे अल्पशा आजाराने नुकतेच निधन झाले. त्यांच्या निधनाने रोहा तालुक्यात शोककळा पसरली आहे. या दुःखद प्रसंगी शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील यांनी देशमुख यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करुन त्यांना धीर दिला.
भाई जयंत पाटील यांच्या भेटीदरम्यान उपस्थित कार्यकर्त्यांनी स्नेहा यांच्या जुन्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या निधनाबद्दल हळहळ व्यक्त केली. या सांत्वनपर भेटीप्रसंगी शेतकरी कामगार पक्ष महाराष्ट्र राज्य सरचिटणीस भाई जयंत पाटील, शेकाप जिल्हा चिटणीस सुरेश खैरे, आरडीसीसी बँक संचालक गणेश मढवी, जिल्हा फेडरेशनचे अध्यक्ष हेमंत ठाकूर, शेकाप तालुका चिटणीस शिवराम महाबळे, खांडेकर आण्णा, प्रताप देशमुख, मनोहर महाबळे, खांडेकर सर, गोपीनाथ गंभै, विकास तांडेल, महादेव शिंगरे, आरे बु सरपंच राजेंद्र मळेकर, युवक अध्यक्ष संतोष दिवकर, अमोल शिंगरे शंकर दिवकर, महिला आघाडी प्रमुख रोहा कांचन ताई माळी, खेळू ढमाल, राजू तेलंगे, प्रविण जांभेकर, तुकाराम शिंदे, सुयोष गांगल तसेच शेतकरी कामगार पक्ष रोहा तालुका कार्यकत, ज्येष्ठ नेते सरपंच उपसरपंच आदी पदाधिकारी होते. सर्वांनी गांगल कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना या कठीण प्रसंगी आधार दिला.






