। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या मातोश्री सावित्री देवी यांचं वयाच्या 91 व्या वर्षी निधन झालं आहे. उत्तराखंड येथील पौडी गढवाल जिल्ह्यातील राहत्या घरी सावित्री देवी यांनी अखेरचा श्वास घेतला. पौडीचे एसएसपी सर्वेश कुमार यांनी सावित्री देवींच्या निधनाची पुष्टी केली आहे. सावित्री देवी याा पौडी गढवाल जिल्ह्यातील पंचूर गावात राहत होत्या. याच गावात योगी आदित्यनाथ यांचा जन्म झाला होता. त्यांचे वडील आनंद सिंह बिष्ट हे वन विभागात कार्यरत होते. 2020 मध्ये वयाच्या 89व्या वर्षी आनंद सिंह बिष्ट यांचं निधन झालं आहे.





