| मुरुड-जंजिरा | प्रतिनिधी |
ठाणे महानगरपालिकेच्यावतीने आणि फोटो सर्कल सोसायटी यांच्या सहकार्याने ठाणे महापौर चषक राष्ट्रीय छायाचित्र स्पर्धेतील निवडक छायाचित्रांचे ‘आविष्कार 2026’ या प्रदर्शनाचे आयोजन दि.19 ते 22 नोव्हेंबर या कालावधीत परबवाडी येथील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे कलादालन येथे करण्यात आले होते. या स्पर्धेत मुरुड तालुक्यातील छायाचित्रकार सुधीर नाझरे यांच्या चित्राला विशेष पुरस्काराने गौरवण्यात आले. दि.22 नोव्हेंबर रोजी पार पडलेल्या पारितोषिक वितरण कार्यक्रमात सुधीर नाझरे व निर्मला नाझरे यांना प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. यावेळी आमदार ॲड. माधवी नाईक यांच्यासह खासदार नरेश म्हस्के, ठाणे उपायुक्त मीनल पालांडे, फोटो सर्कल सोसायटीच्या अध्यक्षा अंजू मानसिंग, ख्यातकीर्द छायाचित्रकार विजय बारसे आदी मान्यवर उपस्थि होते. देशातील सर्वात मोठ्या राष्ट्रीय छायाचित्र स्पर्धांपैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या स्पर्धेत यंदा देशभरातील 692 छायाचित्रकारांनी तब्बल 7018 छायाचित्रे सादर केली होती. त्यातील ‘स्ट्रीट’ या विषयाचे सुधीर नाझरे यांचे मंगलोर येथील ‘अग्नीकेली’ या फोटोला गौरवण्यात आले. या प्रदर्शनात नाझरे यांची 5 चित्र समाविष्ट होती.







